समाजकार्य महाविद्यालयात रंगल्या वार्षिक क्रीडा स्पर्धां

अमळनेर (प्रतिनिधी) येथील श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी संचलित समाजकार्य महाविद्यालयात क्रीडा विभागामार्फत वार्षिक क्रीडा स्पर्धा घेण्यात आली. यात विविध खेळांच्या स्पर्धा झाल्या. त्यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

स्पर्धांचे उद्घाटन समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील व औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्राचार्य विनोद वैद्य यांनी केले. क्रिकेट, बुध्दिबळ, थाळी फेक,भाला फेक लांब उडी, १००/२००/४०० मीटर रनिंग, हॉलबॉल या स्पर्धांना विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.  या स्पर्धात सहभागी व विजेते झालेले स्पर्धकाचे अध्यक्ष अभिजित भांडारकर, व्यवस्थापन यांनी कौतुक केले.

स्पर्धां यशस्वी करण्यासाठी क्रीडा संचालक डॉ. श्वेता वैद्य, डॉ. बी. डी. खंडागळे, डॉ. जगदीश सोनवणे, डॉ. अस्मिता सर्वैया, डॉ. एस. आर. चव्हाण, दिलीप कापडणीस, शिरीष जाधव, पाठक, डॉ. अनिता खेडकर, प्रा. डी. आर. ढगे, प्रा. विजयकुमार वाघमारे यांनी परीश्रम घेतले.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *