रामेश्वर येथे पाच जणांकडून एकाला मारहाण; जीवे मारण्याच्या धमक्या, गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील रामेश्वर खुर्द येथे घराजवळून जाण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून पाच जणांनी एकाला चापटाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची घटना ९ रोजी सकाळी घडली. याप्रकरणी छबिलाल दीदारसिंग जाधव यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनो दिलेली अधिक माहिती अशी की, छबिलाल दीदारसिंग जाधव हे पत्नीसमवेत रामेश्वर येथे राहतात. त्यांची दोन्ही मुले नोकरीनिमित्त बाहेरगावी असतात. ९ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास छबिलाल जाधव हे त्यांच्या भावाच्या घराजवळून जात असताना गावातील पुनमचंद चव्हाण, अंकुश राठोड, पुना वंजारी, संजय चव्हाण आणि संतोष वंजारी हे तेथे आले. त्यांनी छबिलाल जाधव यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच पुन्हा आमच्या घराजवळ आला तर पायामध्ये गाडून टाकू, मानेत घाव घालू आणि मोटारसायकलने उडवून देऊ, अशा धमक्या देत शिवीगाळ केली. पाचही जणांकडून मारहाण सुरू असताना छबिलाल यांचे भाऊ व इतर ग्रामस्थांनी मध्यस्थी करून भांडण सोडविले. त्यानंतर संशयित तेथून निघून गेले. याप्रकरणी छबिलाल जाधव यांच्या तक्रारीवरून पुनमचंद चव्हाण, अंकुश राठोड, पुना वंजारी, संजय चव्हाण आणि संतोष वंजारी या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *