
आमदार अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात केले अन्नदान
राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया विभाग व विद्यार्थी काँग्रेसचा सेवाभावी उपक्रम

अमळनेर (प्रतिनिधी) माजी मंत्री तथा अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभाग आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, अमळनेर यांच्या वतीने वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना अन्नदानाचा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. कोणताही जल्लोष न करता समाजोपयोगी उपक्रमाद्वारे वाढदिवस साजरा करत समाजसेवेचा आदर्श यावेळी घालून देण्यात आला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे तसेच अमळनेर येथील श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थान येथे लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर आमदार अनिल पाटील यांनी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा संवेदनशील निर्णय घेतला होता. त्यांच्या या भूमिकेचा आदर राखत कार्यकर्त्यांनी फटाके, बॅनरबाजी किंवा जल्लोष टाळून समाजोपयोगी उपक्रमाद्वारे वाढदिवसाचे औचित्य साधले.
यावेळी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना प्रेमपूर्वक भोजनाचे वाटप करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या आरोग्याची विचारपूसही करण्यात आली. समाजाप्रती असलेली बांधिलकी, सेवाभाव आणि माणुसकी जपण्याची प्रेरणा आमदार अनिल पाटील यांच्या कार्यातून मिळते. त्यांच्या सेवाभावी विचारांतून प्रेरणा घेऊन हा उपक्रम राबविण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचे जळगाव जिल्हाध्यक्ष सनी गायकवाड यांनी सांगितले.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष कृष्णा बोरसे यांनी आमदार अनिल पाटील यांना उत्तम आरोग्य, निरोगी दीर्घायुष्य लाभावे तसेच त्यांच्या हातून जनहिताची आणि विकासाची कामे अधिक व्यापक स्वरूपात घडत राहावीत, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. या सेवाभावी उपक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचे जळगाव जिल्हाध्यक्ष सनी गायकवाड, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष कृष्णा बोरसे, ललित बाविस्कर, विद्यार्थी काँग्रेसचे कार्याध्यक्ष मनीष देसले, उपाध्यक्ष हुजेफा पठाण, तालुका उपाध्यक्ष प्रणव चौधरी, युवक शहर कार्याध्यक्ष चैतन्य सनदाशिव, अंमळगाव येथील युवा नेते योगेश पाटील, सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष करण साळुंखे, जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानदीप सांगोरे, सोशल मीडिया शहराध्यक्ष रोहित सूर्यवंशी, प्रताप महाविद्यालय विद्यार्थी अध्यक्ष कुशन पाटील, विद्यार्थी सरचिटणीस तुषार ठाकरे, तसेच यश पवार, समीर शेख, यश शेटे, अजय पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply