
प्रताप हायस्कूलमध्ये चित्रकलेचा रंगोत्सव; १,०४३ विद्यार्थ्यांनी दिली शासकीय परीक्षा
अमळनेर (प्रतिनिधी) दि. १ ऑक्टोबर खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप हायस्कूल येथे शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट) परीक्षा सुरळीतपणे संपन्न झाली. १८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या या परीक्षेत अमळनेर तालुक्यातील सुमारे ३० शाळांमधून एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
एलिमेंटरी परीक्षेसाठी ५४३ तर इंटरमिजिएट परीक्षेसाठी ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. परीक्षेच्या विविध सत्रांमध्ये वस्तुचित्र, स्मरणचित्र, रचना, भूमिती तसेच अक्षरलेखनाचे पेपर घेण्यात आले. अमळनेर तालुक्यातील विविध माध्यमांच्या शाळांनी या परीक्षेत सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तालुक्यातील कला शिक्षकांनी सहकार्य केले.
परीक्षेचे केंद्र समन्वयक म्हणून डी. एन. पालवे, तर सहसमन्वयक म्हणून के. व्ही. पाठक यांनी जबाबदारी सांभाळली. मुख्याध्यापक ए. डी. भदाणे, लिपिक सागर पवार, प्रसाद गोसावी यांच्यासह खान्देश शिक्षण मंडळाच्या संचालकांचे सहकार्य लाभले.
या शाळा होत्या सहभागी
श्रीमती डी. आर. कन्या शाळा, पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूल, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल, न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल, लोकमान्य विद्यालय, साने गुरूजी कन्या स्कूल, साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय, श्री. एन. टी. मुंदडा माध्यमिक विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय, अल फैज उर्दू हायस्कूल, श्रीराम गबाजी सोनवणे विद्या मंदिर भरवस, बालाजी विद्यालय गांधली पिळोदे, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा दहिवद, आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अंमळगाव, नवभारत माध्यमिक विद्यालय दहिवद, आदर्श माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय मांडळ, सु. ह. मुंदडे मा. उच्च माध्य. विद्यालय मारवड, माध्यमिक विद्यालय ढेकू खुर्द, दत्त माध्यमिक विद्यालय पातोंडा, माध्यमिक विद्यालय दोधवद, डी. एन. पाटील माध्यमिक विद्यालय चौबारी, एकात्मता माध्यमिक विद्यालय शहापूर, कै. एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालय धार मालपुर, बी. बी. ठाकरे माध्यमिक विद्यालय वावडे, झेड. डी. सोनवणे हायस्कूल मुडी, माध्यमिक विद्यालय लोण बुद्रुक, महात्मा फुले माध्यमिक विद्यालय पिंपळी, शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे, के. व्ही. पाटील माध्यमिक विद्यालय सारबेटे तसेच अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे शासकीय आश्रम शाळा यांनी सहभाग नोंदविला.

Leave a Reply