अमळनेरच्या दोन बालकांनी पूर्ण केले पवित्र रमजानचे सर्व रोजे

अमळनेर (प्रतिनिधी) आत्मसंयम, श्रद्धा आणि समर्पण यांचे प्रतीक असलेल्या पवित्र रमजान महिन्यात अमळनेर येथील दोन लहान बालकांनी पूर्ण रोजे करीत  समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

पवित्र रमजान महिन्यात उपवास (रोजा) पाळणे हे इस्लाम धर्मातील अत्यंत महत्त्वाचे कर्तव्य मानले जाते. यात जकी अहमद तौसिफखान (वय ८ वर्ष) आणि वली अहमद अहेतेशामखान (वय ९ वर्ष) या बालकांनी संपूर्ण रमजान महिन्यात एकही दिवस न चुकवता सर्व रोजे पूर्ण केले. एवढ्या लहान वयात त्यांनी दाखवलेली चिकाटी, निष्ठा आणि धार्मिक भावना सर्वांच्या कौतुकास पात्र ठरत आहे.

रमजान महिन्यात रोजा ठेवणे म्हणजे केवळ अन्न-पाण्याचा त्याग नव्हे, तर मन, वर्तन आणि विचार यांमध्ये शुद्धता राखत आत्मसंयम साधणे होय. उपवासाच्या माध्यमातून सहनशीलता, शिस्त आणि अल्लाहप्रती अढळ श्रद्धा जोपासली जाते. या दोन्ही बालकांनी हे सर्व गुण आपल्या कृतीतून प्रभावीपणे दाखवून दिले आहेत. त्यांच्या या प्रेरणादायी कार्याबद्दल कुटुंबीय, नातेवाईक तसेच परिसरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे. लहान वयातच धार्मिक मूल्यांचे पालन करून त्यांनी इतर मुलांसाठीही आदर्श निर्माण केला असून, त्यांच्या या प्रयत्नामुळे समाजात सकारात्मक संदेश पसरत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *