अमळनेरमध्ये नवीन तहसील कार्यालयाबाहेर स्व. अजितदादा पवार यांचा पुतळा उभारण्याची मागणी

अमळनेर (प्रतिनिधी)  शहरात बांधण्यात येत असलेल्या नवीन तहसील कार्यालयाच्या बाह्य परिसरात माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांचा पुतळा उभारण्यात यावा, तसेच यासाठी शासन स्तरावर यथायोग्य पाठपुरावा करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मुख्तार खाटीक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे व आमदार अनिल पाटील यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अमळनेर तालुक्याच्या विकासासाठी स्व. अजित पवार यांनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला होता. महसूल इमारत, प्रशासकीय इमारत, उपजिल्हा रुग्णालय, पंचायत समिती इमारत, एसटी कार्यशाळा तसेच निम्न तापी प्रकल्पांतर्गत पाडळसरे धरण या महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यामुळे तालुक्याच्या विकासात त्यांचा मोठा वाटा असून, त्यांच्या कार्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नवीन प्रशासकीय इमारतीबाहेर त्यांचे स्मारक अथवा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी खासदार स्मिता वाघ, आमदार अनिल पाटील, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी सामूहिकरीत्या प्रयत्न करून आवश्यक कागदपत्रे व प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठपुरावा करावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या निवेदनावर शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, कार्याध्यक्ष विनोद कदम, इम्रान खाटीक, आलिम मुजावर, सचिन पाटील, राहुल गोत्राळ, कैलास पाटील, गोविंदा बाविस्कर, निलेश देशमुख, अर्षद खाटीक, भूषण पाटील, अनिल शिसोदे, सुलतान खाटीक, मधुकर पाटील, महेंद्र पाटील, किशोर देसले, जाकीर खाटीक, निखिल पाटील, पंकज जैन, जे. व्ही. बाविस्कर, एन. जे. पाटील, एस. जी. बत्तीसे, एस. आर. शिंगाणे, चेतन बोरसे, भैय्या वाघ, बाबा खाटीक, गौरव पाटील आदींच्या सह्या आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *