
रुग्ण कल्याण समितीवर गोविंदा बाविस्कर, रितेश मराठे, अलका पवार यांची अशासकीय सदस्यपदी निवड
अमळनेर (प्रतिनिधी) येथील ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीवर प्रतिष्ठित नागरिक म्हणून गोविंदा बाविस्कर, रितेश मराठे आणि अलका पवार या तिघांची अशासकीय सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील आरोग्यविषयक उपक्रम अधिक लोकाभिमुख, बळकट आणि गतिमान करण्यासह सर्वसामान्य जनतेला सुलभ, गुणवत्तापूर्ण व परिणामकारक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही निवड करण्यात आली आहे.
राज्यातील आरोग्यव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी तसेच आरोग्यविषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विधानसभा मतदारसंघ स्तरावर एकात्मिक आरोग्यवर्धिनी समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या समितीचे अध्यक्ष आमदार असणार असून, तालुका आरोग्य अधिकारी सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. या समितीवर अशासकीय सदस्य म्हणून गोविंदा बाविस्कर, रितेश मराठे आणि अलका पवार यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल आमदार अनिल पाटील, माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने नवनियुक्त सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

Leave a Reply