
खानदेश शिक्षण मंडळ पतपेढीतर्फे सभेत सभासदांना १० टक्के लाभांशासह भेटवस्तू
अमळनेर (प्रतिनिधी) : येथील खानदेश शिक्षण मंडळ कर्मचारी सहकारी पतपेढीची सर्वसाधारण सभा ५ रोजी शहरातील जी. एस. हायस्कूलमधील आयएमए हॉल येथे उत्साहात पार पडली. यावेळी सभासदांना रोख स्वरूपात १० टक्के लाभांश तसेच भेटवस्तूचे वाटप करण्यात आले.
सभेदरम्यान सभासदांनी जामीनकी कर्जाच्या मर्यादेत वाढ करणे, सभासदांच्या पाल्यांसाठी विविध योजना सुरू करणे, सभासद विमा योजना राबविणे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पतपेढीतील सभासदत्व सुरू ठेवणे यासह विविध विषय मांडले. या मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. संस्थेच्या हिताचा विचार करून सकारात्मक भूमिका घेत योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन संचालक मंडळाने दिले. यावेळी पतपेढीचे अध्यक्ष चंद्रकांत कंखरे, उपाध्यक्ष आर. जे. पाटील, सचिव जयश्री भालेराव, खजिनदार कैलास बाविस्कर, संचालक लक्ष्मण पाटील, किरण सनेर, मनोहर पाटील, राहुल पाटील, वैशाली पाटील, संजय बत्तीसे तसेच संस्थेचे सेक्रेटरी भिका भावसार आदी उपस्थित होते.

Leave a Reply