श्री मंगळग्रह मंदिरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन

अमळनेर (प्रतिनिधी) श्री मंगळग्रह मंदिर येथे मंगळवार, १३ ऑक्टोबर रोजी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन निवृत्त डीवायएसपी राजेंद्र भामरे, निवृत्त तहसीलदार सुदाम महाजन आणि नगरसेवक विजय कहारू पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

मा. ना. चंद्रकांतदादा पाटील, समर्थ युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे आणि खानदेश शिक्षण मंडळ, मंगळग्रह सेवा संस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती, लोकमान्य शिक्षण मंडळ व सखाराम महाराज वाडी संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त आनंद महाले, मुख्य कार्यकारी अधिकारी ॲड. आर. जी. चव्हाण, पी. एन. ज्वेलर्सचे संचालक पंकज सोनार, डॉ. भटनागर, महेश कोठावदे, मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, डॉ. मिलिंद पाटील, डाटा मॅनेजर मनोहर तायडे, अकाऊंटंट योगेश पाटील आणि दैनिक ‘ग्लोबल महातेज’चे कार्यकारी संपादक भरत पाटील आदी उपस्थित होते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *