राज्यस्तरीय सेवानिवृत्त पुरस्काराने अमळनेरचे चिंधू वानखेडे व श्री सर्जेराव पाटील सन्मानित

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र पेन्शन असोसिएशन, पुणे यांच्यामार्फत सर्वोत्कृष्ट पेन्शनर पुरस्कार अमळनेर येथील सेवानिवृत्त केंद्रप्रमुख चिंधू ओंकार वानखेडे व सेवानिवृत्त ग्रेडेड मुख्याध्यापक सर्जेराव पाटील यांना प्रदान करण्यात आला.

श्री क्षेत्र नर्सि नामदेव (ता. सेनगाव, जि. हिंगोली) येथे हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. राज्य पेन्शनर मंडळाचे अध्यक्ष एन. डी. मारणे यांच्या हस्ते पुस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र व ५०० रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सदाशिव सोनवणे, तालुकाध्यक्ष हिम्मतराव पाटील, राज्य कार्यकारणी सदस्य धनराज पाटील, यादव सिनकर, जिल्हा कार्यकारिणीतील जगदीश महाजन, आयुबशहा जमालशहा, गोपीचंद सोनवणे, साहेबराव पाटील, तालुकाध्यक्ष दिलीप पाटील, वसंत पाटील, प्रकाश साळुंखे, जगदीश महाजन, काथेराम परदेशी, गंगाधर पाटील, बारकू पाटील यांनी स्वागत केले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *