
विनायकराव पाटील विद्यालयात कै. न्हानाभाऊ साळुंखे यांची पुण्यतिथी साजरी
अमळनेर (प्रतिनिधी) करणखेडा येथील विनायकराव यादवराव पाटील माध्यमिक विद्यालयात कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम साळुंखे यांची ३४ वी पुण्यतिथी १२ नोव्हेंबर रोजी श्रद्धेने साजरी करण्यात आली. यानिमित्त कै. न्हानाभाऊ साळुंखे आणि करणखेडा गावाचे माजी सरपंच कै. दादासो विनायकराव पाटील यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला शाळेचे स्थानिक चेअरमन विश्वासराव विनायकराव पाटील, संस्थेचे संचालक दिनेश वासुदेव साळुंखे, कै. न्हानाभाऊ साळुंखे यांचे नातू तुषार गरुड, करणखेडा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच महेंद्र पाटील, ताराचंद सूर्यवंशी, लक्ष्मण पाटील, मारवड गावातील माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील, हरिभाऊ मारवडकर, शाळेचे मुख्याध्यापक एन. एस. पवार यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply