खान अलीझा रिजवानुर रहमान पठाण हिचे नीट परीक्षेत प्रथम प्रयत्नात घवघवीत यश

अमळनेर  (प्रतिनिधी) येथील जापान जिन परिसरातील खान अलीझा रिजवानुर रहमान पठाण हिने राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा (नीट) प्रथम प्रयत्नातच उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिने ७२० पैकी ५९५ गुण मिळवले असून जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या तिन्ही विज्ञान विषयांमध्ये ९९ पेक्षा अधिक टक्केवारी स्थान (पर्सेंटाइल) मिळवत आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे.

यापूर्वी खान अलीझा हिने मुंदडा कनिष्ठ महाविद्यालयातून बारावीची परीक्षा ९० टक्क्यांहून अधिक गुणांनी उत्तीर्ण होत शैक्षणिक क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध केली होती. आता राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील यशामुळे तिच्या वैद्यकीय शिक्षणाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे. खान अलीझा रिजवानुर रहमान पठाण ही अल-फैज उर्दू गर्ल्स हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका खान अनीसा परवीन यांच्या भावाची कन्या आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल समाजातील मान्यवर, शिक्षकवृंद, नातेवाईक तसेच मित्रपरिवाराकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *