अमळनेर तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत १२० मल्लांचा थरार; चुरशीच्या लढतींनी रंगला आखाडा

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव आणि पंचायत समिती शिक्षण विभाग, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धांचे आयोजन तालुका क्रीडा संकुल येथे करण्यात आले. उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या स्पर्धेत कुस्तीच्या चुरशीच्या लढती आणि मल्लांचा थरार पाहायला मिळाला.

अमळनेर तालुक्यातील विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील मुले व मुली अशा एकूण १२० मल्लांनी स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन अमळनेर पोलीस विभागाच्या पीएसआय कविता ठाणगे यांच्या हस्ते झाले. यावेळी अमळनेर कुस्ती महासंघाचे बाळू भाऊ पाटील, माजी नगरसेवक प्रताप आबा पाटील, दामिनी पथकाच्या प्रमुख नम्रता जरे, संजय पाटील भुतबापु, पैलवान संजय भिला पाटील आणि क्रीडा अध्यक्ष एस. पी. वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी प्रतिमापूजन करून श्रीफळ वाढवत स्पर्धेची सुरुवात केली. स्पर्धेचे पंच म्हणून महेश माळी यांनी काम पाहिले. समितीचे सदस्य के. आर. बाविस्कर, प्रा. प्रितेश तुरणकर, बापूराव सांगोरे, आर. ए. घुगे, स्वप्नील पाटील आणि गोकुळ बोरसे यांनी स्पर्धेच्या आयोजनात सहभाग घेतला. यावेळी एच. आर. बाविस्कर, अरविंद मोरे, रविंद्र भोई, योगराज चौधरी, पवन शिंपी आणि भावेश कोळी उपस्थित होते. स्पर्धेत विजयी झालेल्या अमळनेर तालुक्यातील सर्व मल्लांचे अभिनंदन करून कौतुक केले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *