
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जी. एस. हायस्कूलमध्ये वृक्षारोपण
अमळनेर (प्रतिनिधी) नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय, अमळनेर येथील आंतरवासिता अंतर्गत प्रशिक्षणार्थी शिक्षक विद्यार्थ्यांनी प्राध्यापक डॉ. सुनंदा तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर शहरातील जी. एस. हायस्कूलमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती केली.
यावेळी विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्त्व, पर्यावरणाचे संरक्षण तसेच वाढत्या प्रदूषणाचे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर प्रशिक्षणार्थी शिक्षक विद्यार्थी प्रतीक्षा पाटील, निकिता पाटील, रुचिका पाटील, नेहा पाटील, नूतन पाटील, सोनल पाटील आणि प्रज्ञा पाटील यांच्या पुढाकाराने वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. यावेळी जी. एस. हायस्कूलचे मुख्याध्यापक विनोद कदम तसेच शिक्षक आर. जे. पाटील उपस्थित होते. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने वृक्षलागवड करण्यासोबतच लावलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Leave a Reply