प्रा. मनेश पाटील यांना कॉम्प्युटर सायन्समध्ये विद्यावाचस्पती पदवी प्रदान

अमळनेर (प्रतिनिधी)  श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील प्रा. मनेश प्रकाशराव पाटील यांनी मध्य प्रदेशातील पी. के. विद्यापीठ, शिवपुरी येथून कॉम्प्युटर सायन्स व इंजिनिअरिंग विद्याशाखेत विद्यावाचस्पती (डॉक्टरेट) पदवी संपादन केली आहे.

विद्यापीठाच्या रिसर्च सुपरवायझर डॉ. मोनिका त्रिपाठी व विद्यापीठ प्रबंधक यांच्या उपस्थितीत त्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. प्रा. डॉ. मनेश पाटील यांनी ‘ए नोव्हेल हायब्रिड कॉन्व्होल्युशन अँड मल्टीस्केल डायलेटेड एफिशियंटनेट बी-७ बेस्ड प्लांट डिसीज डिटेक्शन अँड क्लासिफिकेशन विथ अॅडॅप्टिव्ह सेगमेंटेशन प्रोसीजर्स’ या विषयावर संशोधनपर प्रबंध सादर केला होता. वनस्पतींवरील रोगांचे अचूक निदान व वर्गीकरण करण्यासाठी आधुनिक संगणकीय तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित पद्धतींचा अभ्यास या संशोधनात करण्यात आला आहे. या संशोधनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. हितेंद्र पाटील आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रा. डॉ. इंद्रभान बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले. डॉक्टरेट पदवी संपादन केल्याबद्दल प्राचार्य प्रा. डॉ. हितेंद्र पाटील यांच्या हस्ते प्रा. डॉ. मनेश पाटील यांचा महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. तसेच कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागात विभागप्रमुख प्रा. डॉ. इंद्रभान बोरसे, प्रा. डॉ. सुरेखा पाटील आणि विभागातील सहकारी प्राध्यापकांच्या उपस्थितीत त्यांचा गौरव करण्यात आला. प्रा. डॉ. मनेश पाटील यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष कुणाल पाटील, महाविद्यालयाचे अध्यक्ष सुभाष देवरे आणि उद्योजक विलास देवरे यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक व संशोधनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *