
अमळनेर तालुक्यात शालेय क्रीडा स्पर्धां रंगणार; १७ सप्टेंबरपासून होणार सुरुवात
अमळनेर (प्रतिनिधी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व अमळनेर पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२६-२७ मधील शालेय शासकीय अमळनेर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांना १७ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे.
या स्पर्धांमध्ये बुद्धिबळ, बॅडमिंटन, कुस्ती, फुटबॉल, हॉलीबॉल, कॅरम, कबड्डी, खो-खो, क्रिकेट तसेच मैदानी स्पर्धांचा समावेश आहे. बुद्धिबळ स्पर्धा १७ सप्टेंबर रोजी सर्व गटांतील मुलांसाठी आणि १८ सप्टेंबर रोजी सर्व गटांतील मुलींसाठी नोबल पोतदार स्कूल येथे होणार आहेत. बॅडमिंटन स्पर्धा १८ सप्टेंबर रोजी सर्व गटांतील मुलांसाठी व १९ सप्टेंबर रोजी सर्व गटांतील मुलींसाठी प्रताप कॉलेज हॉल येथे होणार आहेत. कुस्ती स्पर्धा २१ सप्टेंबर रोजी सर्व गटांसाठी तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आली आहे. फुटबॉल स्पर्धा २३ सप्टेंबर रोजी सर्व गटांतील मुलांसाठी व २४ सप्टेंबर रोजी सर्व गटांतील मुलींसाठी प्रताप कॉलेज येथे होणार आहेत. हॉलीबॉल स्पर्धा २६ सप्टेंबर रोजी मुलांसाठी व २७ सप्टेंबर रोजी मुलींसाठी जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय येथे होणार आहेत. कॅरम स्पर्धा ३ ऑक्टोबर रोजी सर्व गटांतील मुलांसाठी व ५ ऑक्टोबर रोजी सर्व गटांतील मुलींसाठी ॲड. ललिता पाटील इंग्लिश स्कूल येथे होणार आहेत. कबड्डी स्पर्धा ७ ऑक्टोबर रोजी सर्व गटांतील मुलांसाठी व ८ ऑक्टोबर रोजी सर्व गटांतील मुलींसाठी सायर देवी स्कूल येथे आयोजित करण्यात आली आहे. खो-खो स्पर्धा १० ऑक्टोबर रोजी सर्व गटांतील मुलांसाठी व १२ ऑक्टोबर रोजी सर्व गटांतील मुलींसाठी आ.मा. पाटील आश्रमशाळा, रणाईचे येथे होणार आहेत. क्रिकेट स्पर्धा १३ ऑक्टोबर रोजी सर्व गटांतील मुलांसाठी व १४ ऑक्टोबर रोजी सर्व गटांतील मुलींसाठी प्रताप कॉलेज येथे होणार आहेत. मैदानी स्पर्धा १६ ऑक्टोबर रोजी सर्व गटांतील मुलांसाठी व १७ ऑक्टोबर रोजी सर्व गटांतील मुलींसाठी तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आली आहे. तालुक्यातील सर्व शाळा व ज्युनिअर कॉलेज यांनी स्पर्धांसाठी ऑनलाइन नोंदणी करून, ऑनलाइन फी भरून तसेच स्पर्धेचे प्रवेश काढून संघ व खेळाडू तयार ठेवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अमळनेर तालुका क्रीडा समितीचे क्रीडा अधिकारी जगदिश चौधरी, एस. पी. वाघ व संजय पाटील यांनी ही माहिती दिली.

Leave a Reply