
मालपूर विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी हिंमतराव पवार बिनविरोध
अमळनेर (प्रतिनिधी) मालपूर येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी हिंमतराव राघो पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर व्हाईस चेअरमनपदी जतनबाई दशरथ पाटील यांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. त्यांच्या निवडीचे स्वागत केले जात आहे.
सोसायटीच्या सभागृहात संचालक मंडळाच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. या वेळी उपस्थित संचालक व सभासदांनी दोन्ही पदांसाठी एकमताने पाठिंबा दर्शविल्याने ही निवड बिनविरोध झाली. या प्रसंगी संचालक बळवंत भोजू पवार, संजय मुरलीधर पवार, नरेंद्र शांताराम पवार, प्रिया गोसावी, भिमराव महादेव पवार, रावण तुळशीराम पवार, रवींद्र हिंमतराव पाटील, विजयाबाई विश्वासराव पवार, वैशाली अनिल पवार, कविता प्रफुल्ल पवार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून एस. के. कुलकर्णी यांनी काम पाहिले. तर सोसायटीचे सचिव कृष्णकांत जगन्नाथ भावसार यांनी निवड प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य केले. नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांनी कौतुक करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply