सारबेटा सबस्टेशनजवळ सामाजिक वनीकरणाच्या झाडांना लागली आग

अमळनेर (प्रतिनिधी)  तालुक्यातील सारबेटा येथील सबस्टेशनजवळ सामाजिक वनीकरणाच्या झाडांना गुरुवारी दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीमुळे परिसरात काही काळ धुराचे लोट पसरले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील सारबेटा येथील सबस्टेशनजवळ सामाजिक वनीकरणाच्या झाडांना आग लागली. या आगीचे स्वरूप वाढत असल्याचे लक्षात येताच अमळनेर नगरपालिकेला तातडीने माहिती देण्यात आली. मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या आदेशानुसार अग्निशमन दलाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने जलद हालचाल करत पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. अग्निशमन प्रमुख गणेश गोसावी यांच्यासह कर्मचारी फारुक शेख, भिका संदानशिव आणि आकाश बाविस्कर यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी परिश्रम घेतले. अग्निशमन दल वेळेत पोहोचल्यामुळे मोठे नुकसान टळल्याचे सांगण्यात आले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *