
आदिवासी ठाकूर समाजातील महिलांनी पारंपरिक विधिवत होळी पेटवून कुटुंब व समाजाच्या समृद्धीसाठी केली प्रार्थना
अमळनेरमध्ये शिमगा उत्सवाची दणदणीत सुरुवात
अमळनेर (प्रतिनिधी) येथील आदिवासी ठाकूर जमातीतील महिलांनी पारंपरिक पद्धतीने विधिवत होळी पेटवून कुटुंब व समाजाच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली. समाजबांधवांच्या मोठ्या उपस्थितीत ‘होळी रे होळी’च्या जयघोषात शिमगा उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. टाऊन वाल परिसरातील रहिवाशांनीही सहभाग नोंदविला. पारंपरिक श्रद्धा, एकोपा आणि सांस्कृतिक जतनाचा संदेश देणारा हा सोहळा अमळनेरमध्ये उत्साहात पार पडला.
ठाकूर समाजाच्या होळीत उंबराचा दांडा उभा करून होळी रचण्याची विशेष परंपरा आहे. शहरात वास्तव्यास असूनही ठाकूर समाज पिढ्यानपिढ्या आपली संस्कृती आणि परंपरा जपत आहे. वर्षानुवर्षे अमळनेरमध्ये सामूहिकरीत्या होळी साजरी करण्याची प्रथा आजही तितक्याच श्रद्धा आणि उत्साहाने जोपासली जात आहे.
यावेळी ठाकूर जमातीच्या महिला मंडळातर्फे होळीला खण व नारळ अर्पण करण्यात आले. रंगीत पताका, फुगे आणि आकर्षक रांगोळीने होळी परिसर सजवण्यात आला होता. महिला प्रमुख मिनाताई ठाकूर, कोषाध्यक्ष अपेक्षा पवार, उपाध्यक्ष बेबिताई ठाकूर, हिराबाई ठाकूर यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. ओटी व नैवेद्य अर्पण करून मंत्रोच्चारात होळीला अग्नी देण्यात आला.
कार्यक्रमास अमळनेर जमात प्रमुख दिलीप ठाकूर, राज्य सरचिटणीस तथा अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे, सचिव प्रकाश वाघ, गुणवंत वाघ, दिलीप वानखेडे, चंद्रशेखर ठाकूर, अरुण चव्हाण, मच्छिंद्र बागुल, अनिल ठाकूर, धनराज ठाकूर, प्रकाश ठाकूर, लीलाधर ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी होळीला हारडा, हार-कंगन व पुष्प अर्पण करून पूजन केले. आदिवासी ठाकूर समाजात पाच दिवसीय होळीचा शिमगा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. यावेळी समाजबांधव व भगिनींनी होळीच्या अग्नीभोवती फेर धरून आनंदोत्सव साजरा केला. उपस्थितांना प्रसाद म्हणून गुळाची जिलेबी वाटप करण्यात आली.
कार्यक्रमास यशवंत सूर्यवंशी, देविदास ठाकूर, कुणाल ठाकूर, हेमंत ठाकूर, विजय ठाकूर, वामन चव्हाण, भैया ठाकूर, अनिल ठाकूर, वेलचंद ठाकूर, उमाकांत ठाकूर, संजय सूर्यवंशी, गजानन ठाकूर, चंद्रकांत ठाकूर, तेजपाल ठाकूर, उमेश वरून शंकपाळ, काशिनाथ ठाकूर, शुभम ठाकूर, राजेंद्र ठाकूर, सुरज ठाकूर, मनोज ठाकूर, दीपक देविदास ठाकूर, ऋषिकेश ठाकूर, मुकेश महाले, तांबेपुरा, रोहित ठाकूर यांच्यासह महिला मंडळाच्या आशा ठाकूर, भारती ठाकूर, संगीता ठाकूर, स्वाती ठाकूर, प्रियंका ठाकूर, मनीषा ठाकूर, मंगल ठाकूर, रुपाली ठाकूर, दिपाली ठाकूर, कल्पना ठाकूर, गायत्री ठाकूर, वर्षा पवार, प्रतिभा पवार, दुर्गा सूर्यवंशी, शांताबाई पवार, पल्लवी ठाकूर, नेहा ठाकूर, रत्नप्रभा ठाकूर, तेजस्विनी ठाकूर, स्नेहा ठाकूर, विजया ठाकूर, मिना ठाकूर, मंगला ठाकूर आदींसह मोठ्या संख्येने बालगोपाळ उपस्थित होते.

Leave a Reply