अमळनेरात सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंच्या संकल्पनेतून साकारला श्री त्रिविक्रम मठ; गुरुवारी शुभारंभ सोहळा

अमळनेर (प्रतिनिधी) कान्हादेशीयांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब म्हणजे सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू यांच्या संकल्पनेतून श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशनअंतर्गत अमळनेर येथे श्री त्रिविक्रम मठ साकारण्यात आला आहे. या मठाचा शुभारंभ गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता भक्तिमय वातावरणात होणार आहे.

ललिता पंचमी, आश्विन शुद्ध पंचमी, शके १९४८ या शुभदिनी हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. श्री त्रिविक्रम मठ, मुंदडानगर १, पाण्याच्या टाकीजवळ, अमळनेर येथे हा कार्यक्रम होणार आहे. या शुभारंभ सोहळ्यात सर्वांनी सहभागी होऊन भक्तिभावाने आणि उत्साहात हा मंगलमय क्षण साजरा करावा, असे आवाहन सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र, अमळनेर व कान्हादेश यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *