लोकसहभागातून धारच्या शिव टेकडीवर वृक्षारोपण; हिरवाईने नटविण्याचा संकल्प!

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील धार येथील शिव टेकडीवर २६ नोव्हेंबर रोजी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. पर्यावरण संवर्धन आणि निसर्गाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शिव टेकडी हिरवाईने नटविण्यासाठी लोकसहभागातून पुढाकार घेण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, माजी जिल्हा परिषद सदस्या तथा जिल्हा बँकेच्या संचालिका जयश्री पाटील, बाजार समितीचे संचालक सचिन बाळू पाटील, डांगरी येथील माजी सरपंच अनिल शिसोदे, कळमसरे येथील विकास सोसायटीचे माजी चेअरमन तथा संचालक बाबुलाल पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी एकरुखीचे सरपंच सुरेश पाटील, तासखेडा येथील माजी सरपंच तापीराम पाटील, अरुण पवार, दत्तात्रय पवार, मिलिंद पाटील, धार येथील माजी सरपंच गणेश धोंडू पाटील, माजी सरपंच वसंत काटे, अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष अलीम मुजावर, संजय पाटील, चंद्रशेखर पाटील, सोमनाथ पाटील, यशवंत शंकर पाटील, आबा सोनार, मधुकर गव्हाणे, रज्जाक शाह, मनोज पाटील, दिलीप पाटील, समाधान पाटील, स्वप्निल पाटील आदी उपस्थित होते. शिव टेकडीवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यासाठी विविध स्तरांतून प्रयत्न सुरू आहेत. केवळ वृक्षलागवड न करता लावलेल्या झाडांचे योग्य संगोपन करून त्यांचे संवर्धन करण्यावरही भर दिला जात आहे. भविष्यात शिव टेकडी हिरवाईने नटावी आणि परिसराचे नैसर्गिक सौंदर्य वाढावे, यासाठी लोकसहभागातून सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *