
अमळनेरच्या हर्ष अग्रवालने जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातून मिळवली सायबर सिक्युरिटीत मास्टर्स पदवी
अमळनेर (प्रतिनिधी) येथील हर्ष गोविंद अग्रवाल याने अमेरिकेतील प्रतिष्ठित जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठ, वॉशिंग्टन डी.सी. येथून सायबर सिक्युरिटी इन कॉम्प्युटर सायन्स या विषयात मास्टर ऑफ सायन्स पदवी उत्कृष्ट गुणांसह संपादन केली आहे. त्याने ४ पैकी ३.९ जीपीए मिळवत ही पदवी यशस्वीरित्या पूर्ण केली असून, त्याच्या या यशामुळे अमळनेरच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठ हे अमेरिकेतील नामांकित विद्यापीठांपैकी एक मानले जाते. अशा प्रतिष्ठित विद्यापीठातून उच्च शिक्षण घेत हर्षने आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर हे उल्लेखनीय यश मिळवले आहे. परदेशात राहून शिक्षण पूर्ण करताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. मात्र, सातत्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने शैक्षणिक यशाची उंची गाठली.
हर्ष हा अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी तसेच मोहन कृषी उद्योगचे संचालक गोविंद अग्रवाल यांचा चिरंजीव आहे. मुलाच्या या यशामुळे अग्रवाल परिवारात आनंदाचे वातावरण असून, अमळनेर शहरातूनही त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सायबर सिक्युरिटीसारख्या आधुनिक आणि महत्त्वपूर्ण क्षेत्रात उच्च शिक्षण घेतल्याने भविष्यात हर्ष आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार आणि नातेवाईकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply