विजया जैन यांची सावित्री महिला सक्षमीकरण फाउंडेशनच्या जिल्हा महिला आघाडी अध्यक्षपदी निवड

अमळनेर (प्रतिनिधी )सावित्री महिला शक्तिकारण फाऊंडेशन यांच्या वतीने अमळनेर येथील विजया दिलीप जैन यांची जळगाव-धुळे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

दि. १४ मे २०२६ रोजी संस्थापक अध्यक्ष राहुल जगन्नाथ भापकर यांच्या स्वाक्षरीने त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. फाउंडेशन महाराष्ट्रभर महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवत असून, विजया जैन यांच्या सामाजिक कार्याची आवड, कार्यक्षमता व पात्रता लक्षात घेऊन ही निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सुभाष चौक, अमळनेर येथील नवकार गृह उद्योगाशी संबंधित असलेल्या जैन यांच्यावर महिलांसाठी विविध उपक्रम राबविणे, महिला सक्षमीकरणासाठी मदत करणे तसेच फाउंडेशनचा पाया अधिक मजबूत करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या निवडीबद्दल विजया जैन यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून संस्थापक अध्यक्ष राहुल भापकर यांनी त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *