
आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत धान्य खरेदी प्रक्रियेला सुरुवात ; शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ घेण्याचे आवाहन
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुका को-ऑप फ्रुट सेल सोसायटीमार्फत शासकीय ज्वारी, मका व भरड धान्य खरेदी प्रक्रियेचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला शेतकरी व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जानवे येथील शेतकरी स्वप्नील सुरेश पाटील यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर ज्वारीची प्रत्यक्ष मोजणी करून खरेदी प्रक्रियेस औपचारिक सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी बोलताना आमदार अनिल पाटील यांनी शेतकऱ्यांना शासनाच्या हमीभाव योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा तसेच त्यांची आर्थिक फसवणूक होऊ नये, यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचे चेअरमन भागवत पाटील यांनी संस्थेमार्फत शेतकऱ्यांना पारदर्शक व सुलभ सेवा देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे नमूद केले. शेतमाल खरेदी प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास संचालक पुरुषोत्तम पाटील, सुरेश पाटील, शामकांत पाटील, जयेशकुमार काटे, प्रफुल्ल पाटील, हिलाल सैंदाणे, ज्ञानेश्वर धनगर, सुनिल काटे, दिनकर पाटील, के. व्ही. पाटील, कामराज पाटील, मॅनेजर लहू पाटील, कर्मचारी वर्ग तसेच तालुक्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी तालुक्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी शासकीय धान्य खरेदी केंद्राचा लाभ घेऊन हमीभावाचा फायदा घ्यावा, असे आवाहन केले.

Leave a Reply