
अमळनेर तालुका कुस्ती निवड चाचणी ६ डिसेंबरला; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पैलवानांची निवड होणार
अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी अमळनेर तालुक्यातील पैलवानांची निवड करण्यासाठी रविवार, ६ डिसेंबर रोजी तालुकास्तरीय कुस्ती निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा संकुल, अमळनेर येथे होणाऱ्या या स्पर्धेत विविध वयोगटांतील पैलवानांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सन २०२६ व २०२७ या वर्षासाठी जळगाव जिल्हास्तरीय कुस्ती निवड चाचणी स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने ही निवड चाचणी घेण्यात येणार आहे. सकाळी ८.३० ते १० वाजेपर्यंत वजन काटा होईल, तर सकाळी १०.३० वाजता कुस्त्यांना सुरुवात होणार आहे. स्पर्धेत १५ वर्षांखालील कुमार गटासाठी ३८, ४१, ४४, ४८, ५२, ६७, ६८, ७५ व ८५ किलो वजन गट असतील. १७ वर्षांखालील मुलांसाठी ४५, ४८, ५१, ५५, ६०, ६५, ७१, ८०, ९२ व ११० किलो वजन गट असतील. २० वर्षांखालील फ्री स्टाईलमध्ये ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२, ९७ व १२५ किलो, तर ग्रीको रोमनमध्ये ५५, ६०, ६३, ६७, ७२, ७७, ८२, ८७, ९७ व १३० किलो वजन गट असतील. वरिष्ठ महाराष्ट्र केसरी ग्रीको रोमन पुरुष गटासाठी ५५, ६०, ६३, ६७, ७२, ७७, ८२, ८७ व ९७ किलो, तर ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी गटासाठी ८७ ते १३० किलो वजन गट ठेवण्यात आले आहेत. यामध्ये १५, १७ व २० वर्षांखालील कुमार फ्री स्टाईल व ग्रीको रोमन मुले तसेच वरिष्ठ ग्रीको रोमन पुरुष गटांचा समावेश आहे. स्पर्धेचे आयोजन तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष विश्वास संतोष पाटील (बाळू), संजय कौतिक पाटील, हाजी शब्बीर पैलवान, प्रताप अशोक शिंपी, संजय पैलवान, रावसाहेब पाटील, भरत पवार आणि तांत्रिक समितीचे प्रवीण कुमार पाटील यांनी केले आहे. कुमार गटातील स्पर्धकांसाठी जन्मतारखेचा दाखला, वैद्यकीय प्रमाणपत्र व पालकांचे संमतीपत्र आवश्यक आहे. तसेच स्पर्धेसाठी येताना पासपोर्ट, आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र व शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र सोबत आणावे. सर्व मूळ कागदपत्रांसह प्रत्येक कागदपत्राची एक छायांकित प्रत आणणे आवश्यक आहे. अमळनेर तालुक्यातील जास्तीत जास्त पैलवानांनी या निवड चाचणी स्पर्धेत सहभागी व्हावे, तसेच अधिक माहितीसाठी ९९७०९३६५१०, ९०२८३०५७३०, ९६०४४३३७१४. यावर संपर्क साधावा, असे आवाहन अमळनेर तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply