रणाईचेत उद्या बिडकरबाबाजींचा भव्य सत्कार; गावातील वीरपुत्रांचाही होणार सन्मान!

अमळनेर (प्रतिनिधी) अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्रद्धेय प.पू.प.म. श्रीवर्धनस्थ बिडकरबाबाजी यांचा भव्य सत्कार आणि भारतीय संरक्षण दलात सेवा देणाऱ्या रणाईचे गावातील वीरपुत्रांचा सन्मान सोहळा उद्या शनिवारी, २८ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. प्रणवाश्रम, रणाईचे येथे सकाळी ९ वाजता हा सोहळा पार पडणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उपाध्ये कुळाचार्य, ज्ञानरत्न, श्रद्धेय प.पू.प.म. श्रीवर्धनस्थ बिडकरबाबाजी यांचा ग्रामपंचायत रणाईचे व समस्त ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बिडकरबाबाजी स्वतः भूषविणार असून, त्यांच्या शुभहस्ते भारतीय संरक्षण दलात यशस्वी सेवा देणाऱ्या गावातील वीरपुत्रांचा सन्मान करण्यात येणार आहे. गावातील वीरपुत्रांनी भारतीय संरक्षण दलात बजावलेली सेवा ही रणाईचे गावासाठी अभिमानाची बाब असून, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सर्व सत्कारमूर्ती, भाविक, महानुभाव भक्त आणि ग्रामस्थांनी उपस्थित राहून शुभाशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन ग्रामपंचायत रणाईचे व समस्त ग्रामस्थ मंडळींच्या वतीने करण्यात आले आहे.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *