
एनसीएमसी कार्ड नसल्यास ज्येष्ठ नागरिक व महिलांना पूर्ण तिकीट; सवलतीची मुदत संपली, आजपासून कार्ड लागू
अमळनेर (प्रतिनिधी) : राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मिळणाऱ्या प्रवास सवलतीचा लाभ घेण्यासाठी राष्ट्रीय सामान्य प्रवास कार्ड अर्थात एनसीएमसी कार्ड आता अनिवार्य करण्यात आले आहे. शासनाने हे कार्ड काढण्यासाठी दिलेली मुदत ३१ ऑगस्ट २०२६ रोजी संपली असून, १ सप्टेंबरपासून कार्ड नसलेल्या पात्र प्रवाशांना सवलतीचे तिकीट मिळणार नसल्याची माहिती जळगाव विभागाचे विभागीय नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली आहे.
ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी एसटी बस प्रवासात शासनाकडून सवलत देण्यात येते. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी राष्ट्रीय सामान्य प्रवास कार्डचा वापर करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शासनाने पात्र प्रवाशांना हे कार्ड काढण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदत दिली होती. त्यामुळे मुदत संपल्यानंतर कार्ड नसलेल्या प्रवाशांना सवलतीच्या तिकिटाऐवजी प्रवासाचे पूर्ण तिकीट घ्यावे लागणार आहे. यामुळे नियमित एसटी प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी आपल्याकडे राष्ट्रीय सामान्य प्रवास कार्ड आहे की नाही, याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. कार्ड नसल्यास बसमध्ये सवलतीच्या तिकिटासाठी पात्रता असूनही त्याचा लाभ घेता येणार नसल्याने प्रवाशांना अधिक भाडे द्यावे लागू शकते. दरम्यान, राष्ट्रीय सामान्य प्रवास कार्ड काढण्यासाठी शासनाकडून वाढीव मुदत देण्यात येणार आहे का, याबाबत अद्याप कोणतेही नवीन आदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे सध्या ३१ ऑगस्ट हीच अंतिम मुदत असून, १ सप्टेंबरपासून कार्डशिवाय सवलतीचे तिकीट देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी एसटी बसने प्रवास करताना राष्ट्रीय सामान्य प्रवास कार्ड सोबत ठेवावे, असे आवाहन करण्यात येत आहे. वाढीव मुदतीबाबत शासनाकडून नवीन आदेश प्राप्त झाल्यास त्यानुसार पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
कार्ड नसल्यास पूर्णच तिकीट लागेल
शासनाने एनसीएमसी कार्ड साठी ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंतच मुदत दिली होती.यामुळे आज १ सप्टेंबर पासून जेष्ठ नागरिक व महिलांसाठी हे कार्ड सक्तीचेच असेल.ज्यांच्याकडे कार्ड नसेल त्यांना सवलतीचे तिकीट मिळणार नाही.या कार्डसाठी वाढीव मुदत येईल किंवा याबाबत अद्याप कोणतेही आदेश प्राप्त नाही.
– प्रज्ञेश बोरसे, विभागीय नियंत्रक,जळगाव

Leave a Reply