अमळनेरात २० डिसेंबरला ११ जोडप्यांचा सामूहिक निकाह; नावनोंदणीसाठी १० नोव्हेंबरपर्यंत मुदत

अमळनेर (प्रतिनिधी) : ऑल मुस्लिम समाजातील वधू-वरांसाठी हसनैन करीमैन वेल्फेअर संस्था, अमळनेर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. २० डिसेंबर २०२६ रोजी इंदिरा गांधी भवन, अमळनेर येथे हा सोहळा होणार असून, संस्थेचे अध्यक्ष हाजी मोना शेख यांच्या अध्यक्षतेखाली ११ जोडप्यांचे सामूहिक निकाह पार पडणार आहेत.

आर्थिकदृष्ट्या गरजू कुटुंबांना विवाहाचा मोठा खर्च परवडत नसल्याने सामूहिक विवाहाच्या माध्यमातून त्यांना आधार देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. विवाहातील अनावश्यक खर्चाला आळा घालून गरजू वधू-वरांना सन्मानाने वैवाहिक जीवनाची सुरुवात करून देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

या सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक वधू-वरास संस्थेच्या वतीने पलंग सेट, कपाट तसेच संसारोपयोगी वस्तू देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक वधू-वराच्या कुटुंबातील १०० व्यक्तींच्या भोजनाची व्यवस्था संस्थेतर्फे करण्यात येणार आहे. सामूहिक विवाह सोहळ्यात आपल्या मुला-मुलींची नावनोंदणी करू इच्छिणाऱ्या पालकांनी दि. १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी ७५०७१५७७८६ / ९०४९९४९९४१ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल. या उपक्रमासाठी हसनैन करीमैन वेल्फेअर संस्थेचे अध्यक्ष हाजी मोना शेख, उपाध्यक्ष सैय्यद नबी व जुबेर पठाण, सचिव सैय्यद अजहर अली, सहसचिव अशफाक शेख, खजिनदार आरिफ मेमन तसेच सदस्य जाकिर शेख, हाजी मट्या खाटीक आणि इम्रान शेख परिश्रम घेत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *