अमळनेरच्या पैलाड भागात ४४ वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या; पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील पैलाड भागात राहणाऱ्या ४४ वर्षीय इसमाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पैलाड भागातील विजय श्रावण पाटील (वय ४४) यांनी आपल्या राहत्या घरातील लाकडी कडीला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना २४ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून पोलीस विविध अंगांनी तपास करीत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *