
अमळनेरात लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ‘ग्रीन ग्रुपचा रंगोत्सवात’ रंगांची उधळण
पाण्याचा, कृत्रिम व रसायनिक रंगांचा वापर न करता उधळले नैसर्गिक रंग
अमळनेर (प्रतिनिधी) येथील ग्रीन ग्रुप आयोजित ‘रंगोत्सव २०२६- चला उधळूया मैत्रीचे रंग’ या धुलीवंदन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत तरुणांसह ज्येष्ठ मंडळींनी रंगात रंगून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. संगीत व वाद्यांच्या तालावर रंगांची उधळण करत सर्वांनी एकच जल्लोष केला. या वेळी विशेष म्हणजे पाण्याचा अपव्यय टाळत तसेच कृत्रिम व रसायनिक रंगांचा वापर न करता नैसर्गिक रंगांची उधळण करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी दहा वाजता तहसील आवाराबाहेर करण्यात आली. याठिकाणी मंडप उभारून डीजेच्या तालावर सहभागी रंगोत्सवाचा आनंद घेत होते. विशेष म्हणजे पाण्याचा अपव्यय टाळत तसेच कृत्रिम व रसायनिक रंगांचा वापर न करता नैसर्गिक रंगांची उधळण करण्यात आली. पर्यावरणपूरक धुलीवंदन साजरे करण्याचा संदेश देण्यात आला. या रंगोत्सवाला स्मिता वाघ आणि अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते सहभागींचे अभिवादन करण्यात आले. तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून धुलीवंदनाचा आनंद घेतला.
ग्रीन ग्रुपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असलेला हा ग्रुप दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात रंगोत्सवाचे आयोजन केले होते. या वेळी माजी नगरसेवक विक्रांत पाटील, नगरसेवक सचिन पाटील, देवेंद्र कांबळे, सामाजिक कार्यकर्ते विजय राजपूत, सयाजीराव कापडणीस, जितेंद्र ठाकूर, सुरेश पाटील, नितीन निळे, सुनील शिंपी, सचिन वाघ, प्रमोद पाटील, अमोल मालचे, महेश संकलेचा, उमेश सोनार, सागर वाघ यांच्यासह ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply