
तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या मुलींचा संघ विजयी
अमळनेर (प्रतिनिधी) क्रीडा व युवक कल्याण विभागातर्फे २९ सप्टेंबर रोजी अमळनेर येथे आयोजित तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या १४ वर्षांखालील विद्यार्थिनींच्या संघाने तालुका विजेतेपद पटकावले.
अंतिम सामन्यात स्वामी विवेकानंद स्कूलच्या संघावर मात करत या संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले. मुलींच्या या संघाच्या यशामुळे ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या शिरपेचात पुन्हा एकदा विजयाचा तुरा रोवला गेला आहे. विजयी संघातील विद्यार्थिनींचे जिजाऊ बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा ॲड. ललिता पाटील यांनी कौतुक केले. तसेच प्राचार्य डॉ. नीरज चव्हाण यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले. विजयी विद्यार्थिनींना प्रशिक्षण देण्यासाठी शाळेचे क्रीडा शिक्षक सागर चावरिया, केदार देशमुख, रमेश धनगर व ममता पाटील यांनी अपार कष्ट घेतले. विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल शाळेतील सर्व शिक्षकांनी त्यांचे कौतुक केले असून, सर्व स्तरातून विजयी संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply