श्री स्वामी समर्थ केंद्राच्या अध्यक्षपदी मनोज बी. पाटील यांची नियुक्ती

अमळनेर (प्रतिनिधी) येथील दत्त हौसिंग सोसायटी रोडवरील प्रमुख श्री स्वामी समर्थ केंद्राच्या नूतन सात सदस्यीय कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली असून, अध्यक्षपदी मनोज बी. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिवपदी किशोर पाटील, तर खजिनदारपदी हिरालाल पाटील यांची निवड झाली आहे. नूतन कार्यकारिणीने पदभार स्वीकारल्याने केंद्राच्या आगामी धार्मिक व सामाजिक उपक्रमांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

यापूर्वी केंद्राची सात सदस्यीय कार्यकारिणी अस्तित्वात होती. मात्र, तत्कालीन कार्यकारिणीतील काही सदस्यांचे निधन झाल्याने काही पदे रिक्त झाली होती. त्यामुळे नव्या कार्यकारिणीच्या स्थापनेची प्रक्रिया करण्यात आली. यासंदर्भात जळगाव येथील धर्मादाय उपायुक्त राम अनंत लिपटे यांनी १३ सप्टेंबर रोजी निकाल दिल्यानंतर नव्या सात सदस्यीय कार्यकारिणीला मान्यता मिळाली. नूतन कार्यकारिणीत अध्यक्ष मनोज बी. पाटील, सचिव किशोर पाटील आणि खजिनदार हिरालाल पाटील यांच्यासह औरंगपूरकर, संदीप बोरसे, जगदीश पाटील, राजेंद्र देशमुख आणि एका महिला सदस्याचा समावेश आहे. नव्या कार्यकारिणीने अधिकृतपणे पदभार स्वीकारल्याने केंद्राच्या कामकाजाला नवी दिशा मिळणार असून, धार्मिक व सामाजिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविले जातील, अशी अपेक्षा स्वामी समर्थ भक्तांकडून व्यक्त होत आहे.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *