अमळनेरात खान्देश प्रीमियर लीग १९ मार्चपासून रंगणार

अमळनेर (प्रतिनिधी) खान्देशातील क्रिकेटप्रेमींसाठीखान्देश प्रीमियर लीग २०२६ या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खान्देशातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या लीगला १९ मार्च रोजी सुरुवात होणार असून २९ मार्च रोजी अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेला भारतीय क्रिकेट संघ, रणजी ट्रॉफी तसेच आयपीएलमधील नामांकित खेळाडू उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

या स्पर्धेत संपूर्ण भारतातील संघांना सहभाग घेता येणार असून नवोदित तसेच अनुभवी क्रिकेटपटूंना आपले कौशल्य दाखवण्याची मोठी संधी मिळणार आहे. स्पर्धेतील सर्व सामने दहा दहा षटकांचे असणार आहेत. या खान्देश प्रीमियर लीगमध्ये विजेत्या संघासाठी आकर्षक रोख बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. प्रथम क्रमांकाच्या संघाला एक लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी एकावन्न हजार रुपये तर तृतीय क्रमांकासाठी एकतीस हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी नोंदणी शुल्क एकवीस हजार रुपये इतके ठेवण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघांनी अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य असून संघाची अधिकृत नोंदणी करणे बंधनकारक राहील. स्पर्धेतील सर्व सामने अमळनेर तालुका क्रीडा संकुलात खेळवण्यात येणार आहेत. नोंदणी व अधिक माहितीसाठी ९५७९७६४००४ आणि ९१४५४४२३२४ या क्रमांकांवर संपर्क साधावा. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार पंच व स्पर्धा समितीचा निर्णय अंतिम राहील. कोणत्याही दुखापतीस खेळाडू स्वतः जबाबदार असतील. तसेच कोणत्याही प्रकारच्या गैरवर्तनावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *