
अकाली निधन झालेल्या गुमास्ता नितीन पाटील यांच्या कुटुंबाला बाजार समितीकडून आर्थिक मदत
पन्नास हजार रुपयांचा धनादेश पत्नी वैशाली पाटील यांच्याकडे सुपूर्द; व्यापाऱ्यांकडूनही मदतीची घोषणा

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे गुमास्ता नितीन केशव पाटील यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर बाजार समितीने सामाजिक बांधिलकी जपत त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात दिला.
बाजार समितीत गुमास्ता म्हणून कार्यरत असलेल्या नितीन पाटील यांच्या निधनानंतर बाजार समितीतर्फे त्यांच्या पत्नी वैशाली नितीन पाटील यांना पन्नास हजार रुपयांचा धनादेश व मानधन देऊन मदत करण्यात आली. हा धनादेश बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील, उपसभापती सुरेश पिरन पाटील आणि संचालक शरद पाटील यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी संचालक नितीन पाटील, समाधान धनगर, प्रकाश अमृतकार, अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे, सचिव डॉ. उन्मेष राठोड, उपसचिव अशोक वाघ, योगेश महाजन, प्रशांत राणे यांच्यासह बाजार समितीचे कर्मचारी व गुमास्ता बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, नितीन पाटील यांच्या कुटुंबाला व्यापारी बांधवांकडूनही आर्थिक मदत करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. या मदतीमुळे दुःखाच्या प्रसंगी कुटुंबाला दिलासा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply