
निहारिका कोळी मृत्यू प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) निहारिका कोळी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी समस्त अमळनेर तालुक्यातील समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
निहारिका कोळी यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधून प्रकरणाची सखोल चौकशी करावी. चौकशीत दोषी आढळणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांना तातडीने अटक करून त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. संबंधित यंत्रणेने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा आणि दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याप्रसंगी भूषण कोळी, रावसाहेब कोळी, भिकन कोळी, हिरामण कोळी, मधुकर सोनवणे, सागर कोळी, शरद पाटील, स्वप्निल पाटील, विनोद सोनवणे, चेतन कोळी यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply