उघड्यावर दारू अड्डा; महिलांसमोर होते अश्लील शिवीगाळ

अमळनेर नगरपरिषद व पोलिसांकडे कारवाईची मागणी

 

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील आनंद नगर, पिंपळे रोड येथील ८० फुटी रस्त्यावर दररोज सायंकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत उघड्यावर दारू पिणाऱ्यांचा अड्डा तयार होत असल्याची गंभीर तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. तसेच नगरपरिषद व पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.

संबंधित व्यक्ती मोठमोठ्याने अश्लील शिवीगाळ करत असून घराबाहेर येणाऱ्या महिलांना अपमानास्पद शब्द ऐकावे लागत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नागरिकांनी या प्रकाराला विरोध केल्यानंतर काही जणांनी उलट अंगावर धाव घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिला व ज्येष्ठ नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. स्थानिक रहिवाशांचा सवाल आहे की, सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेला हा प्रकार रोखण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? अंमळनेर नगरपरिषद व पोलिस प्रशासनाने तात्काळ संयुक्त कारवाई करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तसेच नियमित गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *