अमळनेरात आदिवासी विकास सामाजिक परिषदेतर्फे संविधान मूल्यांचा जागर

अमळनेर (प्रतिनिधी) भारतीय संविधान दिनानिमित्त अमळनेर येथे आदिवासी विकास सामाजिक परिषदेतर्फे संविधान दिन उत्साहात आणि अभ्यासपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी संविधानातील मूल्ये, उद्देशिका आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार यावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला तालुक्यातील आदिवासी बांधव, विधिज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, कार्यक्रमाची सुरुवात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अमळनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी भारतीय संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

माजी नगराध्यक्ष सुभाष अण्णा चौधरी आणि अमळनेर वकील संघाच्या माजी अध्यक्ष ॲड. तिलोत्तमा पाटील यांनी संविधानाच्या मूल्यांवर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. संविधान उद्देशिका केवळ वाचनापुरती मर्यादित न राहता ती प्रत्यक्षात अंगीकृत होणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनीही कार्यक्रमाला विशेष उपस्थिती दर्शवली.

अमळनेर येथील विश्वशांती बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांच्या अनुषंगाने तसेच आदिवासी विकास सामाजिक परिषदेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रविण बैसाणे यांच्यासह आदिवासी नेते आप्पा दाभाडे, गोरख साळुंखे, विनोद मोरे (खडके), दयाराम मोरे (बहादरवाडी), देवाभाऊ देसले, कृष्णकांत शिरसाठ, बाळासाहेब सोनवणे, मधुकर चव्हाण (टेलर), रामदास ढालवाले, सतीश पारधी (गांधली), संजय सोनवणे, अजहर तडवी (किंगगाव), अशोक भील (किंगगाव), विजय भील, योगेश भील (जैतपीर), राजेंद्र वाघ, संजय भिल (देवळी), दीपक दाभाडे, कैलास भास्कर, रतीलाल बोरसे (लाडगाव), मंगल भील (वाघोडे), आशिष ब्रम्हे (खडके), गुलाब साळुंखे, पुनमचंद चव्हाण, ज्योतीबाई दाभाडे, कल्याणी पारधी व निशा पारधी आदी मान्यवर आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *