खान्देशचा रील्स स्टार रवी बॉडीगार्ड महाराष्ट्र नायक पुरस्काराने सन्मानित

अमळनेर (प्रतिनिधी ) खान्देशातील प्रसिद्ध रील्स स्टार तथा बॉलिवूड अभिनेता आमिर खान यांचे पहिले बॉडीगार्ड म्हणून ओळख असलेले रवींद्र भोई (रवी बॉडीगार्ड) यांना कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रतिष्ठेचा महाराष्ट्र नायक राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

बीएसएफ बहुउद्देशीय संस्था, सत् कबीर बहुउद्देशीय संस्था आणि उपेक्षित नायक न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे महाराष्ट्र नायक राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील सामाजिक, कृषी, क्रीडा, उद्योग, शैक्षणिक, प्रशासकीय, कला तसेच विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा या पुरस्काराद्वारे गौरव करण्यात आला.

चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात रवींद्र भोई उर्फ रवी बॉडीगार्ड यांना कला क्षेत्रातील योगदान आणि सोशल मीडियावरील लोकप्रियतेची दखल घेत पुरस्कार प्रदान करण्यात आला. रवींद्र भोई हे बॉलिवूड अभिनेता आमिर खान यांचे पहिले बॉडीगार्ड म्हणून कार्यरत राहिले असून त्यांनी सोशल मीडियावरही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक, मोज आणि युट्युब यांसारख्या माध्यमांवर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्यांच्या व्हिडिओ आणि रील्सना प्रचंड प्रतिसाद मिळत असून खान्देशातील युवकांमध्ये ते विशेष लोकप्रिय आहेत.या पुरस्कार सोहळ्याचे मुख्य आयोजक भूषण सरदार होते. रवींद्र भोई यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय सन्मानामुळे खान्देशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *