सडावण येथे शिवप्रेमी क्लासेस व ज्ञानदा वाचनालयातर्फे कला आणि विज्ञान प्रदर्शन

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील सडावन येथे शिवप्रेमी क्लासेस व ज्ञानदा वाचनालय सडावन यांच्या वतीने महाशिवरात्रीचे औचीत्य साधून कला आणि विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील सर्व गावांचा प्रदर्शन पाहण्यासाठी उदंड प्रतीसाद मिळाला.

प्रदर्शनाचे आयोजन गावातील शिवप्रेमी क्लासेसचे संचालक तसेच ज्ञानदा वाचनालय चे अध्यक्ष शिवप्रेमी चंद्रकांत पाटील, सरदार क्लासेस अमळनेरचे शिक्षक प्रफुल्ल संदानशिव, ज्ञानदा वाचनालय तसेच या गावातील सैन्य दलात भरती झालेले सैनिक, गावातील तरुण मंडळी व स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयारी करीत असलेल्या विद्यार्थी मित्र परिवाराच्या सहकार्याने झाले. तसेच कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसिलदार प्रशांत धमके, सुंदरपट्टीचे माजी संरपच सुरेश अर्जुन पाटील (तालुका अध्यक्ष शिवसेना), मोरे सर,  लोकनियुक्त सरपंच भैय्यासाहेब पाटील, बागड सर, सरदार क्लासेसचे संचालक राहुल सरदार, पूजा मॅडम, महेंद्र सर, रोहित सर, वैशाली मॅडम, यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत श्री गजानन महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पन. दिपप्रज्वलन करण्यात आले. गावातील सर्व मराठी शाळांतील तसेच सेवक व प्रतिभावान विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी आपल्या बौध्दीक कौशल्य व आपल्या वैज्ञानीक जिज्ञासा प्रचंड आवडीच्या शक्तिबळावर वेग वेगळ्या प्रयोगाचे सादरीकरण केले. यात अमळनेर तालुक्यातील गावातील विद्यार्थ्यांचा सहभाग देखील होता. तसेच एक विद्यार्थीनी वापी (गुजरात) हून देखील सहभागी झाली होती. एवढ्या ग्रामीण भागात -होणारे एक आगळे-वेगळे तसेच संपूर्ण पंचक्रोशीतील गावांचा उदंड प्रतिसाद लाभला. यावेळी सैन्य दलात नुकतेच भरती झालेले कल्पेश पाटील यांचा  सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तावीक प्रशांत वंजारी यांनी केले .

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *