
चिमनपुरी पिंपळे ग्रुप ग्रामपंचायतमध्ये शिवजयंती जयंती केली उत्साहात साजरी
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंपळे येथील ग्रुप ग्रामपंचायतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक डोळ्यांनी नेत्रहीन दृष्टीशक्ती नसल्याने स्पर्श, श्रवण आणि भक्तीवर भर दिला जातो. पण मनाने महाराजांबद्दल खूप मोठा आदर असलेली व्यक्ती बाजीराव राघो पाटील लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले. आरती करण्यात आली ग्रामपंचायत माजी सदस्य गोकुळ चुडामन पाटील, सतीश दुला पाटील, अरुण संभाजी पाटील, सुदाम बळीराम पाटील, लोटन रूपचंद भिल, ग्रामसेवक किरण लंकेश, ग्रामपंचायत शिपाई सुनील मुरलीधर पाटील, रोजगारसेवक संतोष पाटील, पुरुषोत्तम चौधरी, जयवंत पाटील, साहेबराव पाटील, विनायक पाटील, महेंद्र पाटील, गावातील पोलीस पाटील राजेंद पाटील, प्रकाश पाटील, सुभाष पाटील, विनोद पाटील, मनोहर पाटील, प्रकाश महादू पाटील, गुलाब पाटील आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या जयघोषचा नारा देण्यात आला. सामाजिक कार्यकर्ता युवराज पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply