अमळनेरात राजे संभाजी मित्र मंडळाचा सजीव देखावा ठरतोय आकर्षण

अमळनेर (प्रतिनिधी) संघर्ष, जिद्द, माणुसकी आणि समाजसेवेचा प्रेरणादायी प्रवास साकारत राजे संभाजी मित्र मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित सजीव देखावा साकारला आहे. मंडळाच्या ४० व्या वर्षानिमित्त उभारण्यात आलेला हा देखावा अमळनेरकरांचे विशेष आकर्षण ठरत आहे.

सिंधुताई सपकाळ यांच्या आयुष्यातील संघर्षमय प्रसंग, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी केलेले समाजकार्य, अनाथ व निराधारांसाठीची सेवा तसेच माणुसकीचा संदेश सजीव प्रसंगांतून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. त्यामुळे हा देखावा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता समाजप्रबोधन आणि प्रेरणेचा संदेश देत आहे. राजे संभाजी मित्र मंडळाने गेल्या चार दशकांपासून विविध सामाजिक व प्रेरणादायी विषयांवर सजीव देखावे साकारण्याची परंपरा कायम ठेवली आहे. यंदाही तरुण कलाकारांच्या उत्स्फूर्त सहभागातून देखाव्याची प्रभावी मांडणी करण्यात आली आहे. सिंधुताई सपकाळ यांची भूमिका दक्ष योगेश चौधरी व संकेत हरिश्चंद्र पाटील यांनी साकारली असून, रुद्र अनिल पाटील, आदित्य नितीन पाटील, उमेश सुनील अहिरराव, पीयुष किरण पाटील, अमोल सोमनाथ गरुड, प्रशांत संतोष पाटील, दक्ष योगेश पाटील, यश गोपाल पाटील, हर्षल कृष्णकांत चौधरी, दक्ष अनिल पाटील, जयेश विशाल चौधरी, मोहित सुनील पाटील, हितेश परमेश्वर पाटील आणि हर्षल संजय देसले यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. देखाव्याचे दिग्दर्शन राकेश चौधरी व रुणाल पाटील यांनी केले आहे. मंडळाचे अध्यक्ष हितेश देसले, उपाध्यक्ष नितीन पाटील आणि सचिव राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा देखावा साकारण्यात आला आहे. चार दशकांची सामाजिक व सांस्कृतिक परंपरा पुढे नेत सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनातून संघर्ष, माणुसकी आणि समाजसेवेचा प्रेरणादायी संदेश देण्याचा प्रयत्न मंडळाने केला आहे. सजीव प्रसंग, कलाकारांचा अभिनय आणि सामाजिक आशयामुळे हा देखावा नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *