
अमळनेरमध्ये १६ नोव्हेंबरला तालुकास्तरीय लोकशाही दिन; नागरिकांना समस्या मांडण्याची संधी
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथे १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात नागरिकांना आपल्या विविध शासकीय व नागरी समस्यांबाबत थेट अर्ज दाखल करता येणार असून, प्रलंबित प्रश्न मांडण्याची संधी मिळणार आहे.
लोकशाही दिनात प्रलंबित शासकीय कामे, विविध शासकीय योजनांमधील अडचणी, महसूलविषयक प्रश्न, रेशन, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, जमिनीचे प्रश्न, पाणीपुरवठा, रस्ते तसेच इतर नागरी समस्यांबाबत नागरिकांना अर्ज सादर करता येतील. नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या लोकशाही दिनाचा तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार, अमळनेर यांच्या कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply