
अमळनेर शहरात निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे १२ एप्रिल रोजी आयोजन
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील विठ्ठल नगर परिसरात निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे १२ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले असून जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच सर्व नागरिकांसाठी ही स्पर्धा खुली ठेवण्यात आली आहे. सामाजिक व शैक्षणिक विचारांना चालना देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेसाठी “क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले : जीवन व कार्य” तसेच “डॉ. बाबासाहेब आंबेडकर : जीवन व कार्य” हे दोन विषय देण्यात आले असून निबंध व वक्तृत्व या दोन्ही स्पर्धांसाठी स्पर्धकांनी एकच विषय निवडायचा आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी आठ मिनिटांचा वेळ देण्यात आला असून निबंध ८०० ते १००० शब्दांच्या मर्यादेत असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी आकारली जाणार नाही.
स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी १००० रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ७५० रुपये, तृतीय क्रमांकासाठी ५०० रुपये अशी रोख बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. वक्तृत्व स्पर्धा दि. १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजता विठ्ठल नगर, अमळनेर येथील प्राध्यापक अशोक पवार यांच्या निवासस्थानी (अभ्यासिका) येथे होणार आहे. निबंध स्पर्धेसाठीचे निबंध दि. १० एप्रिल २०२६ पर्यंत पाठवायचे आहेत. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी निबंध पाठविण्यासाठी व अधिक माहितीसाठी संयोजक प्रा. अशोक पवार (मो. ९४२२२७८२५६), हृदयनाथ मोरे (मो. ९४२१५१२०८५), प्रा. राहुल निकम (मो. ९८२३२२२६५९) व बापूराव ठाकरे (मो. ९९६०२०९८२५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply