
अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, एकास अटक करून गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीचे आई वडील भाऊ गावाला गेले असतांनाची संधी साधत एकाने तिच्या खाटेवर जाऊन अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना शहरात २५ रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिल्या उर्फ साहिल रफीक शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातवीत शिकणाऱ्या एका मुलीचे आई, वडील, भाऊ संगमनेर येथे कामाला गेलेले होते. ती मुलगी आपल्या आजीसोबत राहत होती. २५ रोजी पहाटे शिल्या उर्फ साहिल रफिक शेख याने घरात प्रवेश करून मुलीजवळ झोपून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तेव्हढयात तिची आजी घरात आली. आजीने त्याला पकडून चापट मारली. मात्र तो तिला ढकलून घरातून पळून गेला. अल्पवयीन मुलीने स्वतः आजीसोबत पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद दिल्यावरून साहिल शेख याच्या विरुद्ध भारतीय न्या संहिता कलम ७४,७५ ,७६ ,३३३ बालकांच्या लैंगिक अप्रधानपासून संरक्षण अधिनियम २०१२ च्या कलम ८ व १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी त्याला पकडून आणून अटक केली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत आहेत.

Leave a Reply