प्रा. डॉ. कुंदन चंद्रकांत पाटील यांना फार्मसी विषयात पीएच.डी.

अमळनेर (प्रतिनिधी) येथील प्रा. डॉ. कुंदन चंद्रकांत पाटील यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्याकडून औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते त्यांना पीएच.डी. पदवीची अधिकृत अधिसूचना प्रदान करण्यात आली.

प्रा. डॉ. कुंदन चंद्रकांत पाटील यांच्या संशोधनाचा विषय ‘आयुर्वेदिक भस्मांच्या सुरक्षितता आणि परिणामकारकतेचे परीक्षण’ हा होता. या संशोधन कार्यासाठी त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गौतम पी. वडनेरे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. डॉ. कुंदन चंद्रकांत पाटील हे सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी एम. डी. पाटील यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित कॉलेज ऑफ फार्मसी, अमळनेर येथे सलग १७ वर्षे प्राध्यापक म्हणून सेवा बजावली आहे. सध्या ते श्रीमती एस. एस. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, चोपडा येथे विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

शैक्षणिक व अध्यापन क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवासोबतच संशोधन क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवृंद, सहकारी, मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *