धार येथील हजरत अब्दुल रज्जाक शहा बाबा उर्स यात्रा २० व २१ जून रोजी होणार

महाराष्ट्रासह गुजरात-मध्यप्रदेशातून हजारो भाविकांची उपस्थिती अपेक्षित

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील धार येथील हिंदू-मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या सुप्रसिद्ध हजरत अब्दुल रज्जाक शहा बाबा दर्गा येथे वार्षिक उर्स यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा शनिवार, दि. २० जून रोजी संदल तर रविवार, दि. २१ जून रोजी उर्स यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे.

इस्लाम धर्मातील पवित्र मोहरम महिन्याच्या पाचव्या दिवशी हा उर्स भरविण्याची परंपरा असून, अमळनेर शहरापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर उंच टेकडीवर वसलेला हा दर्गा धार्मिक सौहार्दाचे प्रतीक मानला जातो. या उर्स यात्रेसाठी महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्यप्रदेशातील विविध भागांतून हजारो भाविक दर्शनासाठी दाखल होत असतात. उर्स निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. यात्रेदरम्यान भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आल्याची माहिती दर्गा ट्रस्टतर्फे देण्यात आली आहे. यावेळी भाविकांनी येताना व जाताना वाहने सावकाश चालवावीत, वाहतूक नियमांचे पालन करावे तसेच कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष हाजी नईम मुजावर, उपाध्यक्ष हाजी कलीम मुजावर, सचिव व्ही. एन. मुजावर, संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे अमळनेर तालुका अध्यक्ष अलीम मुजावर, सलाउद्दीन मुजावर, रफिक मुजावर, असलम मुजावर, नाज अहमद उर्फ बाबू पेंटर, अलाउद्दीन मुजावर, नासिर कलीमोद्दीन मुजावर, मुशिर मुजावर तसेच अहेलेकार मुन्ना मुजावर, नासिर मुजावर, जुबेर मुजावर आणि शकील मुजावर यांनी केले आहे. उर्स यात्रेच्या निमित्ताने सर्व धर्मीय भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हजरत अब्दुल रज्जाक शहा बाबा यांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *