हर हर महादेव’च्या जयघोषात पाताळेश्वर मंदिरात ४१ फुटी त्रिशूलाची स्थापना

अमळनेर (प्रतिनिधी) : बोरी नदीच्या मध्यभागी वसलेल्या सुमारे २०० वर्षे जुन्या पाताळेश्वर महादेव मंदिरात ४१ फुटी भव्य त्रिशूलाची भक्तिमय वातावरणात स्थापना करण्यात आली. त्रिशूल स्थापनेनिमित्त फर्ची रोड येथील मारोती मंदिरापासून पाताळेश्वर महादेव मंदिरापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने आणि डीजेच्या तालावर निघालेल्या या शोभायात्रेमुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.

हा भव्य त्रिशूल ज्ञानेश्वर रामा लोहार (रा. पैलाड, अमळनेर) यांच्या वतीने सेवाभावी भावनेतून पाताळेश्वर महादेव मंदिरास अर्पण करण्यात आला. त्रिशूल स्थापनेच्या धार्मिक सोहळ्यास असंख्य भाविकांची उपस्थिती लाभली. पैलाड, वाडी चौक, भोईवाडा तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला.

शोभायात्रेदरम्यान भाविकांनी ‘हर हर महादेव’चा जयघोष करत उत्साह व्यक्त केला. त्रिशूल स्थापनेनंतर भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. या धार्मिक उपक्रमासाठी प्रसाद माऊली ग्रुप आणि शिवशक्ती साउंड यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच सुभाष मामा पाटील, गुलाब बापू गुरव, संदीप शिंगणे, सोनू भोई, हर्षल भोई, रमेश भोई, सुनील कोळी, दिलीप कोळी आणि विजय भाऊ पाटील यांचे मंदिरासाठी वेळोवेळी लाइटिंग व अन्य स्वरूपात सहकार्य लाभत असल्याचे सांगण्यात आले. ४१ फुटी भव्य त्रिशूलाच्या स्थापनेमुळे पाताळेश्वर महादेव मंदिराच्या धार्मिक वैभवात आणखी भर पडली असून, भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *