शिक्षणातील योगदानाला काँग्रेसतर्फे गौरव ; जिल्ह्यातील २५ आदर्श शिक्षकांचा सन्मान

अमळनेर (प्रतिनिधी) : शिक्षक दिनानिमित्त जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे आयोजित विशेष कार्यक्रमात जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या २५ आदर्श शिक्षकांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी अमळनेर तालुक्यातील प्रा. हिरालाल पाटील यांचाही आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष योगेंद्र पाटील, प्रदेश सरचिटणीस हाजी मुक्ती हारून, प्रदेश सचिव प्रवीण सुरवाडे, अखिल भारतीय सेवा दलाचे सचिव विनोद कोळपकर, प्रदेश सरचिटणीस ॲड. सलीम पटेल, ओबीसी सेलचे उपाध्यक्ष विजय महाजन, प्राचार्य एस. एस. राणे, माजी शहर जिल्हाध्यक्ष श्याम तायडे, काँग्रेस उपाध्यक्ष अशोक खलाणे, पंचायत समितीचे माजी सभापती धनगर अण्णा पाटील, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष किरण महाजन, जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार कोसोदे, जिल्हा खजिनदार राहुल बाहेती, वरिष्ठ नेते श्रीधर चौधरी, विजय वाणी, एससी सेलचे अध्यक्ष कटारे, किसान काँग्रेसचे अमळनेर तालुकाध्यक्ष प्रा. दिनेश पवार, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष गोकुळ आबा बोरसे, मगन पाटील, रोहिदास दाजी, रज्जाक शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अमळनेर तालुक्यातील प्रा. हिरालाल पाटील हे पारोळा तालुक्यातील वसंतनगर येथे गेल्या १६ वर्षांपासून कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत आहेत. त्यांच्या शैक्षणिक योगदानाची दखल घेत जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रा. हिरालाल पाटील यांच्या सन्मानाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुभाष जाधव, प्राचार्य के. आर. पाटील, मुख्याध्यापक आर. सी. चौधरी, ज्येष्ठ शिक्षक एस. जे. भामरे, एम. डी. सूर्यवंशी, डी. एस. पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *