जागतिक पृथ्वी दिनानिमित्त अमळनेर नगर परिषदेचा हरित उपक्रम

अमळनेर (प्रतिनिधी) जागतिक पृथ्वी दिनानिमित्त अमळनेर नगर परिषदेतर्फे शहरात विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत मुंबई गल्ली येथील नगर परिषद दवाखाना परिसरात वृक्षारोपण करून पृथ्वी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. परिसर हरित करण्याच्या दृष्टीने या उपक्रमाला विशेष महत्त्व देण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्वांनी पर्यावरण संवर्धनाची गरज अधोरेखित करत हरित शपथ घेतली. “वसुंधरेचे संरक्षण ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे” हा संदेश देत शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

या प्रसंगी नगर परिषद अमळनेरचे स्वच्छता निरीक्षक संतोष जाधव, किरण कंडारे, प्र. मुकादम गौतम बिऱ्हाडे यांच्यासह महिला हौसिंग ट्रस्टच्या महिला पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *