श्री मंगळग्रह मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त कमला प्रयोग अभिषेक-अर्चन

अमळनेर (प्रतिनिधी) येथील श्री मंगळग्रह मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त मंगळवार, १३ ऑक्टोबर रोजी कालभैरवी माता व श्री महाकाली देवी यांच्या मूर्तीवर तसेच श्रीयंत्रावर कमला प्रयोग अभिषेक-अर्चन करण्यात आले.

यावेळी जळगाव येथील श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक श्रीकांत खटोड व सौ. सुधाताई श्रीकांत खटोड तसेच अमळनेर येथील जी. एस. हायस्कूलचे उपशिक्षक आर. जे. पाटील व सौ. श्रद्धाताई आर. पाटील यांनी अभिषेक-अर्चन केले. या धार्मिक विधीचे पौरोहित्य मंदिराचे पुजारी परशुराम शर्मा, यश जोशी व चंद्रकांत जोशी यांनी केले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *